GRAMIN SEARCH BANNER

दापोली : गिम्हवणेमध्ये घराच्या पडवीला आग; 3 लाख 68 हजारांचे नुकसान

Gramin Varta
215 Views

दापोली : शहरालगतच्या गिम्हवणे सहकारनगर येथे सोमवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत अब्दुल हमीद अली मसुरकर यांच्या घराच्या पडवीचा मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा सामना करावा लागला. या आगीत फ्रीज, वॉशिंग मशीन, अन्य यंत्रसामग्री तसेच लाकूडसाठा जळून खाक झाला असून सुमारे ३ लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक पंचनाम्यातून स्पष्ट झाले.

सोमवार रात्री पडवीतून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ मदत धाव घेतली. दापोली आणि खेड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधण्यात आला. दापोली नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच आसपासचे ग्रामस्थ यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आवरत आणली. त्यामुळे खेड येथून दापोलीकडे येत असलेला अग्निशमन बंब अर्ध्या रस्त्यातून परत पाठवावा लागला.

आग लागल्याची माहिती मिळताच दापोलीचे तहसीलदार आनंता बोंबे, पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच ग्राममहसूल अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या आगीत सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र मसुरकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

घटनास्थळी झालेला प्राथमिक पंचनामा गिम्हवणे ग्राममहसूल अधिकारी गणेश लोहार यांनी केला.

Total Visitor Counter

3369228
Share This Article