GRAMIN SEARCH BANNER

रायगड : आंबेनळी घाटात दोन कारचा अपघात

Gramin Varta
184 Views

रायगड :  रायगड आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाच्या आंबेनळी घाटातील पोलादपूर महाबळेश्वर सुरुर  मार्गवर चिरेखिंड (ता. पोलादपूर) गावाच्या हद्दीमध्ये मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक बसून अपघात घडला. या अपघातामध्ये दोन्ही वाहनाचे दर्शनी भागाचे नुकसान झाले असून   सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
      या अपघाताची सविस्तर माहिती अशी की  महाबळेश्वरहून पोलादपूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या  इकोस्पोर्ट गाडीचा चालक वळण घेताना गाडीवरचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या कारला   धडक बसली.
         या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने गाड्यांतील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. पण अपघातानंतर सुमारे दोन तास मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस स्टेशनची पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने दूर करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

       आंबेनळी घाटातील धोकादायक वळणे आणि घसरणारे रस्ते यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. स्थानिकांच्या मते, घाटरस्त्यावर वाहतुकीचे काटेकोर नियमन आणि सतत देखरेख नसल्याने अशा घटना घडत आहेत. पर्यटक व वाहनचालकांनी घाटात सावधगिरीने वाहन चालवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3387166
Share This Article