राजापूर : राजापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश उर्फ बाबुराव कोळेकर (वय ७५) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
सुरेश कोळेकर हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. २५ मे रोजी त्यांनी आपला ७५ वा वाढदिवस साजरा केला होता. २००६ ते २००९ या काळात त्यांनी राजापूर नगर परिषदेचा कार्यभार नगराध्यक्ष म्हणून यशस्वीपणे सांभाळला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
राजापूरचे माजी नगराध्यक्ष सुरेश कोळेकर यांचे हृदयविकाराने निधन
