GRAMIN SEARCH BANNER

देवरुख महाविद्यालयाचा साईराज आंब्रे राज्यस्तर शालेय व्हॉलीबॉल निवड चाचणीसाठी पात्र

Gramin Varta
89 Views

देवरुख : शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील कुमार साईराज उमेश आंब्रे याला १९ वर्षाखाली गटाच्या महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल निवड चाचणीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अण्णासाहेब डांगे क्रीडा संकुल,आष्टा, तालुका: वाळवा, जिल्हा: सांगली येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेत केलेल्या सर्वांगसुंदर खेळाच्या जोरावर त्याला राज्यस्तरीय शालेय निवड चाचणी स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. साईराज आंब्रे सध्या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२वी बँकिंग या वर्गात शिक्षण घेत आहे.साईराज याला व्हॉलीबॉलसह मैदानी खेळाचीही विशेष आवड असून त्याने यावर्षी उंच उडीप्रकारात जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून, कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे.

साईराज याला कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर, क्रीडा शिक्षक तानाजी कदम व सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. साईराज याने मिळवलेल्या यशाचे संसाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. धनंजय दळवी, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. वसंत तावडे, तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitor Counter

3072990
Share This Article