GRAMIN SEARCH BANNER

इस्रोची ऐतिहासिक कामगिरी! ‘बाहुबली’ रॉकेटने कक्षेत स्थापित केला सर्वात शक्तीशाली उपग्रह

Gramin Varta
63 Views

दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी “बाहुबली” रॉकेटचा वापर करून आतापर्यंतचा सर्वात शक्तीशाली संप्रेषण उपग्रह, सीएमएस-०३, कक्षेत स्थापित केला आहे.

इस्रोने सांगितले की या उपग्रहाचे वजन ४,४१० किलोग्रॅम आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार सीएमएस-०३ हे एलव्हीएम३-एम५ रॉकेट वापरून लाँच करण्यात आले. हे मिशन इस्रोसाठी आणखी एक मोठे यश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल इस्रोचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले की, “आपले अंतराळ क्षेत्र आपल्याला अभिमान वाटेल असे काम करत आहे. भारतातील सर्वात शक्तीशाली संप्रेषण उपग्रह, सीएमएस-०३ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अभिनंदन.”

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की, प्रक्षेपण व्हेईकलने संप्रेषण उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत स्थापित केला आहे.

“हा उपग्रह किमान १५ वर्षे दळणवळण सेवा पुरवण्यासाठी निर्माण केलेला आहे आणि हे स्वावलंबी भारताचे आणखी एक उदाहरण आहे”, असे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले. ते म्हणाले की, प्रतिकूल हवामानामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांना मोहिमेत अडचणी आल्या, परंतु त्यांनी कठोर परिश्रम केले आणि यश मिळवले.

हा उपग्रह भारतीय भूभाग आणि सागरी क्षेत्रांना आवश्यक सेवा प्रदान करेल. याचा भारतीय नौदलालाही मोठा फायदा होईल. कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळेल, ज्यामुळे उच्च-क्षमतेच्या बँडविड्थची सुविधा मिळेल. हा उपग्रह दुर्गम आणि अतिदुर्गम भागात डिजिटल सेवा वापरण्यास मदत करेल.

“बाहुबली उपग्रह अचूकपणे कक्षेत स्थापित करण्यात आला आहे. बाहुबली उपग्रहाच्या शक्तीचा हा एक पुरावा आहे”, असे इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी मिशन कंट्रोल सेंटरमधून सांगितले.

आतापर्यंत एलव्हीएम-३ ची सर्व आठ उड्डाणे १०० टक्के यशस्वी झाली आहेत. खराब हवामान असूनही शास्त्रज्ञांनी मोहीम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

या मोहिमेसाठी अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च आला आहे. प्रक्षेपणानंतर अवघ्या १६ मिनिटांत हे रॉकेट उपग्रहाला त्याच्या नियुक्त कक्षेत स्थापित झाले. हे अभियान इस्रोसाठी देखील खास आहे कारण ते पूर्णपणे “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत विकसित केले गेले आहे. या शक्तिशाली रॉकेटची मोठी चर्चा होत आहे कारण ते भारताच्या महत्त्वाकांक्षी “गगनयान मिशन” मध्ये वापरले जाईल. हे अभियान देशाच्या अंतराळ इतिहासातील आणखी एक मैलाचा दगड ठरू शकते.

Total Visitor Counter

3214933
Share This Article