GRAMIN SEARCH BANNER

आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नेपाळी खलाशाचा मृतदेह सापडला

Gramin Varta
107 Views

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात एक दुर्भाग्यपूर्ण घटना उघडकीस आली आहे. आठ दिवसांपूर्वी बोटीवरून बेपत्ता झालेल्या नेपाळी खलाशाचा मृतदेह जेटीजवळील पाण्यात आढळला आहे. समित तेजराम चौधरी (वय २१, रा. मिरकरवाडा, मूळ रा. नेपाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समित हा माजी नगरसेविका वैभवी खेडेकर यांच्या मालकीच्या ‘मिनाक्षी’ या बोटीवर खलाशी म्हणून कार्यरत होता. २५ ऑक्टोबर रोजी तो आपल्या बोटीवरून बेपत्ता झाला. यासंबंधीची माहिती त्याच्या नातेवाईकांनाही देण्यात आली होती.

खलाशांच्या या बेपत्ता होण्याच्या घटनेने परिसरात चिंता व्यक्त केली जात होती. अखेर ३ नोव्हेंबर रोजी मिरकरवाडा जेटी येथील पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3388222
Share This Article