GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : जयस्तंभ सर्कल येथे सुशोभिकरण केलेल्या कठड्याला ट्रक चालक धडक देऊन फरार

पोलिसांनी ट्रकचा लावला शोध

रत्नागिरी : शहरातील जयस्तंभ सर्कल येथे उभारण्यात आलेल्या सुशोभिकरण केलेल्या कठड्याला मंगळवारी सायंकाळी एका ट्रकने जोराची धडक दिली. या धडकेत कठड्याचे मोठे नुकसान झाले असून, धडक दिल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.

काही वर्षांपूर्वी जयस्तंभ सर्कलचे नूतनीकरण करण्यात आले होते. किल्ल्याच्या बुरुजाच्या आकारात बांधलेल्या या सर्कलचे आणि जयस्तंभाचे सुशोभिकरण ‘जे जे आर्ट’ संस्थेमार्फत करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी पावसकडून येणाऱ्या ट्रकने हा कठडा धडकवल्याची माहिती आहे. घटनेच्या वेळी परिसरात अंधार असल्याने हा प्रकार उशिरा लक्षात आला.

जयस्तंभ सर्कलवरील हायमॅस्ट लाईट उशीरा सुरू झाल्यामुळे ट्रकचालकाने काळोखाचा फायदा घेत पलायन केले. तथापि, ट्रॅफिक पोलिसांनी संबंधित ट्रकचा फोटो काढल्याचे समजते. या घटनेनंतर नागरिकांनी ट्रकचालक अथवा संबंधित वाहतूक कंपनीकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची मागणी केली आहे.

Total Visitor Counter

3483792
Share This Article