चिपळूणः संघर्ष क्रीडा मंडळातर्फे रविवारी (ता. ३०) हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांमधून या स्पर्धेसाठी २१ किलोमीटर आणि दहा किलोमीटर साठी सुमारे २५० स्पर्धकांनी आपली नोंदणी केली आहे.
तसेच शालेय गटात पाच किलोमीटर साठी सुमारे बाराशे स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी एअर मार्शल हेमंत भागवत, प्रसाद देवस्थळी रत्नागिरी, संध्या दाभोळकर यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून नेमणूक केली आहे. स्पर्धेला कॅप्टन म्हणून डॉक्टर मनीषा वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्पर्धेत वयांचे पाच ग्रुप करण्यात आल्या असून पुरुष व महिला या विभागात येतात. २१ किलोमीटरसाठी पुरुष व महिला गटात ओपन गट, ३१ ते ४० वय, ४१ ते ५० वय, ५१ ते ६० वय, आणि साठ वर्षावरील असे गट आहेत. तसेच १० किलोमीटर व ५ किलोमीटरसाठी हीच वयोमर्यादा आहे. शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी शालेय गट ठेवण्यात आला आहे.





