GRAMIN SEARCH BANNER

देवरुखच्या विकासासाठी कटिबद्ध: थेट नगराध्यक्षपदी निवडून आल्यास पहिल्या वर्षात ‘बदल’ दिसेल! – सौ. दिक्षा रवींद्र खंडागळे

Gramin Varta
78 Views

देवरुख: नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. दिक्षा रवींद्र खंडागळे यांनी देवरुखच्या जनतेला एक आश्वासक व्हिजन सादर केले असून, थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यास पहिल्या वर्षातच शहरात सकारात्मक आणि ठोस बदल दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या व्हिजनमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, पर्यटन विकास, शेतकरी हित, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

सौ. खंडागळे यांनी मांडलेले देवरुखच्या विकासाचे प्रमुख व्हिजन खालीलप्रमाणे:

आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी:

‘आई-बाबा आरोग्यसेवा योजना

देवरुखमधील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘आई-बाबा आरोग्यसेवा योजना’ राबवली जाईल.या योजनेंतर्गत नगरपंचायततर्फे सर्व नागरिकांची घरी जाऊन मोफत आरोग्य तपासणी आणि आवश्यक औषधोपचार केले जाणार आहेत.

पर्यटन विकास आणि रोजगार निर्मिती :
देवनगरी देवरुखमध्ये पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘देवरुख पर्यटन विकास कक्षाची स्थापना’ केली जाईल. यामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल.

शेतकरी हित आणि कृषी प्रगती :

देवरुख शहरातील शेतकऱ्यांची प्रगती व्हावी यासाठी त्यांना उत्तम दर्जाचे बियाणे मोफत पुरवले जातील, जेणेकरून शेतीत सुधारणा होईल.

वाहतूक आणि पायाभूत सुविधा
शहरातील मोठी समस्या असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पार्किंग धोरण त्वरित राबवले जाईल.

तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या देवरुख शहरात नागरिकांच्या सोयीसाठी सुलभ शौचालये उभारली जातील.

शहरातील रस्ते खड्डेमुक्त केले जातील आणि दर्जेदार पायाभूत सुविधा पुरवण्यावर भर दिला जाईल.

पाणी पुरवठा: 300 लिटर मोफत पाणी आणि स्मार्ट मीटर
प्रत्येक दिवशी प्रत्येक कुटुंबाला 300 लिटर मोफत पाणी दिले जाईल.त्यावरील पाणी वापरासाठी स्मार्ट मीटर बसवले जातील, जेणेकरून नागरिकांना ‘जितका वापर तितकेच पाणी बिल’ भरावे लागेल आणि पाण्याचा अपव्यय टळेल.

निमशहरी भाग असलेल्या देवरुखमधील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी नगरपंचायततर्फे मोफत अभ्यासिका सुरू केली जाईल.NEET आणि JEE अभ्यासक्रमासाठी तीन महिन्यांचे विशेष शिबिर नगरपंचायततर्फे आयोजित केले जाईल.

देवरुखमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कांगणेवाडी येथे कबड्डी स्टेडियम उभारले जाईल.

नगरपंचायतच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांची कमिटी नेमली जाईल.
या कमिटीमध्ये बिगर राजकीय, तज्ञ लोकांचा समावेश असेल, जेणेकरून कारभार कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय लोकाभिमुख राहील.

सौ. दिक्षा खंडागळे यांची ही भूमिका देवरुख शहराला विकासाच्या एका नव्या उंचीवर नेणारी असल्याचे दिसत आहे. विकासाचे हे व्हिजन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी देवरुखच्या जनतेला थेट नगराध्यक्षपदासाठी निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

Total Visitor Counter

3073129
Share This Article