GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : विहिरीत पडलेली बिबट्या मादीची वनविभागाच्या तासभर चाललेल्या मोहिमेत सुटका

Gramin Varta
219 Views

चिपळूण : तनाळी रामवाडी येथे भक्ष्याच्या मागावर असताना एका बिबट्या मादीचा तोल जाऊन ती सुमारे 40 फूट खोल विहिरीत पडल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून वनविभागाने तातडीने बचाव मोहीम राबवून जवळपास तासभराच्या प्रयत्नांनंतर तिची सुटका केली.

विहिरीत सुमारे 10 फूट पाणी असून बिबट्या सतत झुंज देत असल्याचे पथकाला आढळले. दोरीच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत खाली सोडून अखेर तिला सुरक्षितपणे पकडण्यात यश आलं. प्राथमिक तपासणीत ती 1.5 ते 2 वर्षांची मादी असून कोणताही गंभीर अपघात झालेला नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर वनविभागाने तिला जंगलात परत सोडले.

या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली.वनविभागाने नागरिकांना आवाहन केले की, कोणताही वन्यप्राणी संकटात दिसल्यास त्वरित 1926 या टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी.

Total Visitor Counter

3199527
Share This Article