GRAMIN SEARCH BANNER

कलगी तुरा लोककला संवर्धनार्थ योगदान देणाऱ्या शाहीर कलाकारांना ‘कलगी तुरा पुरस्कार-२०२५-२६’ जाहीर

Gramin Varta
279 Views

उदय दणदणे/ मुंबई: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘कलगी तुरा शाहीर पुरस्कार-२०२५-२६’ आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठीचे अन्य पुरस्कार ‘कलगी तुरा समाज उन्नती मंडळ – मुंबई’ या संस्थेच्या वतीने नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर कोकण प्रांताला वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या कलगी तुरा लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गेली ६५ वर्षे कार्यरत असलेल्या या संस्थेने, पिढ्यानपिढ्या गुरुपरंपरा कायम ठेवून या अध्यात्मिक लोककलेला जिवंत ठेवणाऱ्या ज्येष्ठ आणि युवा शाहिरी लोककलावंतांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, सामाजिक, पत्रकारिता आणि कला क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या व्यक्तींनाही या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेल्यांमध्ये शाहिरी लोककलावंतांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. ‘कलगी तुरा शाहीर पुरस्कार-२०२५-२६’ ने सन्मानित होणाऱ्यांमध्ये संजय रत्नाकर गोणबरे (मुंबई), आनंद भिकाजी कुळये (कोंडये तर्फ सोंदळ, राजापूर-रत्नागिरी), हिरु रामचंद्र भोस्तेकर (हार्डी, रोहा-रायगड), योगेश महादेव कातकर (कासे, संगमेश्वर-रत्नागिरी), प्रकाश सुलोचना रामजी पाजणे (मालुक, तळा-रायगड), अनंत सुरेश बावकर (खडकवली, राजापूर-रत्नागिरी), शरद गणपत कदम (कासे-गुरववाडी, संगमेश्वर-रत्नागिरी), शाहिद आदम खेरटकर (पोसरे बुद्रुक, खेड-रत्नागिरी), विकास सखाराम लांबोरे (विवली, लांजा-रत्नागिरी), अंकुश रामचंद्र गुरव (कोचरी, लांजा-रत्नागिरी), जयंत राजाराम चव्हाण (निवेखुर्द, संगमेश्वर-रत्नागिरी), आणि शांताराम विठ्ठल मालप (निवळी-रत्नागिरी) यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, कलगी तुरा उपासक पुरस्कार प्रभाकर हरिश्चंद्र धनावडे (वाटद खंडाळा, रत्नागिरी) यांना जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रात विनोद कैलास गोरे (मुख्य संपादक, दैनिक अक्षराज मीडिया, पुणे) आणि मुझम्मील मुश्ताक काझी (संपादक, ग्रामीण वार्ता, रत्नागिरी) यांना ‘कलगी तुरा आदर्श संपादक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तर, रघुनाथ भागवत (दै. पुढारी, महाड-रायगड) यांना ‘कलगी तुरा आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ‘कलगी तुरा आदर्श आयोजक पुरस्कार’ जय गणेश मित्र मंडळ – दिलीप नामे आणि सहकारी (मुंबई) यांना, आणि ‘कलगी तुरा स्वरध्वनी गौरव पुरस्कार’ अनंत धोंडू बाईत (अरविंद रेकॉर्डिग स्टुडिओ, भांडुप-मुंबई) यांना देण्यात येणार आहे.

कलगी तुरा समाज उन्नती मंडळ – मुंबई संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धा-२०२५-२६’ आणि ‘कलगी तुरा दिनदर्शिका -२०२६’ प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह, दहिसर चेक नाक्याजवळ, महाजन वाडी, मिरारोड -पूर्व मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

सुशांत गणेश जाबरे (उद्योजक/अध्यक्ष-विभग फाउंडेशन व उपाध्यक्ष-युवक महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे (प्रदेश अध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), ना. अदितीताई तटकरे (महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य), आमदार अनिकेत तटकरे, प्रमोद गांधी (उद्योजक/गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष-मनसे), प्रथमेश गावणकर (संचालक, रत्नागिरी तालुका कुणबी विकास सह.पतसंस्था मर्यादित), समाज सेवक दिनेश कुरतडकर, प्रमिल पत्याने (उद्योजक), कैलास (दादा) धाडवे, रवींद्र मटकर (अध्यक्ष न.लो. संस्था), अभयदादा सहस्त्रबुद्धे, नारायण चाफडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस संतोष धारशे यांनी दिली आहे.

Total Visitor Counter

3073036
Share This Article