GRAMIN SEARCH BANNER

मुंबई गोवा महामार्गावर दोन दुचाकींच्या अपघातात 2 ठार, दोन गंभीर

Gramin Varta
511 Views

रायगड : मुंबई–गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील रोहा–कोलाड मार्गावर संभेगाव हद्दीत झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकींना धडक बसून दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात दिनेश भिकू पवार (वय ३४, विठ्ठलनगर–रातवड, माणगाव) आणि जावीर इब्राहिम शाह (धाटाव–रोहा, मूळगाव उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

दुचाकी (एम.एच. ०६ / बी.जी. ३३१८) आणि स्कूटी (एम.एच. ०६ / सी.बी. ३७०१) यांच्यात झालेल्या या भीषण धडकेत जखमी झालेल्या दोघांना तातडीने उपचारासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक साजन कुलकर्णी यांच्यासह पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना मदत कार्य करत वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोजकर करीत आहेत.

Total Visitor Counter

3368248
Share This Article