रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील नवनिर्माण कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मध्ये 02 ऑगस्ट 2025 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यानच्या कालावधीमध्ये तीन टप्प्यांत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा गीत गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. या प्रसंगी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मनस्वी महेश गोरे, द्वितीय क्रमांक सिद्धी प्रकाश भोजने आणि तृतीय क्रमांक रिया मंगेश माटल यांनी पटकावला. पोस्टर स्पर्धेमध्ये मानसी गोरे, अनुश्री साळवी यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला तर तृतीय क्रमांक सिद्धी भोजने आणि शिफा धामसकर यांना विभागून देण्यात आला. रांगोळी स्पर्धेत अकरावी विज्ञान शाखा प्रथम, बारावी कला शाखा द्वितीय तर बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. राष्ट्र भक्तीपर गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक फिजा आणि ग्रुप (बारावी सायन्स) द्वितीय क्रमांक मेहेक खोपकर आणि ग्रुप (अकरावी कॉमर्स) तृतीय क्रमांक सदीन आणि ग्रुप (अकरावी कॉमर्स) उत्तेजनार्थ अक्सा आणि ग्रुप (अकरावी सायन्स) विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे, नवनिर्माण हाय सीबीएसई स्कूलचे प्रिन्सिपल उल्हास सप्रे त्याचबरोबर शिक्षण संस्थेच्या समन्वयिका सीमा हेगशेट्ये मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धांचे व्यवस्थापन प्रा. रोहित यादव, प्रा श्रेया राऊत, प्रा निकिता नलावडे, प्रा. विद्या कुळ्ये यांनी केले. या प्रसंगी प्राचार्य डॉ संजय गवाळे, प्राचार्य उल्हास सप्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हर घर तिरंगा अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
