GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत साखरपुड्याच्या दिवशीच सहा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

दापोली : शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी संगीता तलाठी यांच्या घरी साखरपुडा सुरू असतानाच अज्ञात चोरट्यांनी सुमारे सहा लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या पाटल्या चोरून नेल्याची घटना ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता संदेश तलाठी (ऐश्वर्या बंगला, शिवाजीनगर, दापोली) यांच्या घरी साखरपुड्यानिमित्त मेहंदीचा कार्यक्रम दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुरू होता. मेहंदी काढण्याच्या वेळी त्यांनी दोन्ही हातातील सोन्याच्या पाटल्या काढून ड्रेसिंग टेबलच्या पहिल्या ड्रॉवरमध्ये ठेवल्या होत्या. मात्र त्या वेळी त्या आजारी असल्याने औषधे घेतल्यानंतर त्यांना झोप लागली.

यानंतर घरातील इतर नातेवाईक महिलांच्या हातावर उशिरापर्यंत मेहंदी काढण्याचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान, झोपेतून जाग आल्यानंतर तलाठी यांनी सोन्याच्या पाटल्यांची विचारणा केली असता त्या ड्रॉवरमध्ये आढळून आल्या नाहीत. कोणीतरी अज्ञाताने त्या चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

या घटनेबाबत दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3485935
Share This Article