GRAMIN SEARCH BANNER

राजापूर कोळवणखडी येथे मध्यरात्री घरात घुसून घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना घेतले ताब्यात, पोलिसांची धडक कारवाई

Gramin Varta
19 Views

तुषार पाचलकर / राजापूर

राजापूरमधील मौजे कोळवणखडी, खालची मोरेवाडी येथे 23 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 01.30 वाजण्याच्या सुमारास 04 अज्ञात इसमांनी अंधाराचा फायदा घेत थेकोळवणखडी येथे राहणाऱ्या श्री. सदानंद शांताराम मोरे (55 वर्षे) यांच्या घरी त्यांच्या घरात  शिरून घरातील किचन रुमच्या खिडकीतून 2 अज्ञात इसम व घराचे मुख्य दरवाजातून  2 चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून घरातील पैसे साठवण्याचा डब्बा (ज्यामध्ये अंदाजे 1,000 ते 1,200 रुपये असलेला) घेऊन लुटमारीचा प्रयत्न केला होता. अचानक घडलेल्या या घटनेने मोरे कुटुंब भांबावून गेले होते. तसेच परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

श्री. सदानंद शांताराम मोरे, (55 वर्षे ) यांनी दिल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाणे येथे लागलीच गुन्हा भा. न्या. सं.चे कलम 305 (अ), 331 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी, लांजा श्री. सुरेश कदम व पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव, राजापूर पोलीस ठाणे तसेच पोलीस निरीक्षक, श्री. नितीन ढेरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी यांना या गंभीर गुन्ह्याची लागलीच उकल करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करून तपास पथके तयार करून रवाना केली होती.

या पथकांमार्फत स्थानिक सी.सी.टी.व्हि. फुटेज तपासण्यात आले, स्थानिकांकडून उपयुक्त माहिती प्राप्त करून घेण्यात आली तसेच गोपनीय व तांत्रिक माहीतीच्या आधारे सदरचा गुन्हा हा मोहा ता. कंळब जिल्हा धाराशिव येथील सुनिल पवार व त्याचे साथीदार यांनी केला असल्याचे माहिती प्राप्त झालेली होती.

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे व राजापूर पोलीस ठाणे यांची संयुक्त पथके सदर गुन्हयातील आरोपीत यांच्या शोधाकरिता धाराशिव व सोलापूर या जिल्ह्यामध्ये गेलेली होती.

दिनांक 21/12/2025 रोजी संशयीत आरोपीत सुनिल पवार व त्याचे साथिदार हे इंदापुर हायवे येथे येणार असलेबाबत माहीती प्राप्त झाली त्या अनुषंगाने संशयीत आरोपीत यांचा शोध घेतला.

असता तो व त्याचा साथिदार त्याचे स्कॉरपिओ वाहनासह मिळून आल्याने त्यांना वाहन तसेच घरफोडी करण्याकरिता लागणाऱ्या साहित्य सामानासह ताब्यात घेण्यात आले आहे.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हयातील आरोपीत इसम नामे 1) सुनिल भिमा पवार वय 27, रा. पारधी वस्ती मोहा, ता. कळंब जिल्हा धाराशिव 2) अजय उतरेश्वर गवळी वय 20 रा. पिंपळवाडी लाखनगाव ता. वाशी जि. धाराशिव यांची प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 2 इसमांना निष्पन्न करण्यात आलेले आहे.

या गुन्ह्याच्या अधिक तपास राजापूर पोलीस ठाणे करीत आहे.

ही, कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी व उप विभागीय पोलीस अधिकारी, लांजा उपविभाग श्री. सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव व खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

1) पोउनि. श्री. सुधीर उबाळे, राजापूर पोलीस ठाणे,

2) श्रेणी पोउनि श्री. संदीप ओगले, स्था. गु. अ. शा., रत्नागिरी,

3) पोहवा/909 विजय आंबेकर, स्था. गु. अ. शा., रत्नागिरी,

4) पोहवा/265 योगेश नार्वेकर, स्था. गु. अ. शा., रत्नागिरी,

5) पोहवा/1407 दिपराज पाटील, स्था. गु. अ. शा., रत्नागिरी,

6) पोहवा/306 गणेश सावंत, स्था. गु. अ. शा., रत्नागिरी,

7) पोहवा/1410 सत्यजीत दरेकर, स्था. गु. अ. शा., रत्नागिरी,

8) पोहवा/1050 रामकृष्ण कात्रे, राजापूर पोलीस ठाणे,

9) चा. पोकॉ/519 नितीन घोगले, राजापूर पोलीस ठाणे,

Total Visitor Counter

3072889
Share This Article