पुणे : घाऊक फळबाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक चांगली झाल्याने बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातून २० टेम्पो हिरवी मिरची, राजस्थानातून १५ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, तामिळनाडूतून ३०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स) तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ५ टेम्पो घेवडा, २ टेम्पो भुईमूग शेंग, ३ टेम्पो पावटा, मध्य प्रदेशातून ५० टेम्पो मटार, मध्य प्रदेशातून १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून ५०० गोणी सातारी आले, भेंडी ७ टेम्पो, गवार ५ टेम्पो, टोमॅटो १० हजार पेटी, हिरवी मिरची ७ टेम्पो, काकडी ५ टेम्पो, फ्लॉवर १० ते १५ टेम्पो, गाजर ३ टेम्पो, कोबी ७ टेम्पो, घेवडा ३ टेम्पो, पावटा ४ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १५ टेम्पो, कांदा ९० ट्रक अशी आवक झाली, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ६० टेम्पो अशी आवक झाली.
कोथिंबीर, मेथीच्या दरात घट
मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिर, मेथीची आवक वाढल्याने दरात घट झाली. कोथिंबिरेच्या दीड लाख, तसेच मेथीच्या एक लाख जुडींची आवक झाली. हरभऱ्याच्या ५०० गड्डींची आवक झाली. मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक चांगली हाेत असल्याने दर स्थिर आहेत. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – ८०० ते १५००, मेथी – ५०० ते १०००, शेपू – ८०० ते १२००, कांदापात – १५०० ते २०००, चाकवत – ५०० ते १०००, करडई- ५०० ते १०००, पुदिना – ३०० ते ८००, अंबाडी – ५०० ते १०००, मुळे – १२०० ते २०००, राजगिरा – ५०० ते १०००, चुका- ५०० ते १२००, चवळई – ५०० ते १०००, पालक – १००० ते २०००, हरभरा गड्डी – १००० ते १५००
पपईच्या दरात वाढ
मार्केट यार्डातील फळबाजारात पपईच्या दरात वाढ झाली. थंडीमुळे खरबुजच्या दरात घट झाली असून, अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात मोसंबी ४० ते ५० टन, संत्री १५ ते २० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे ७०० ते एक हजार गोणी, कलिंगड ८ ते १० टेम्पो, खरबूज ८ ते १० टेम्पो, चिकू दोन हजार गोणी, अननस ७ ट्रक, बोरे ३५० ते ४०० गोणी, सीताफळ १० ते २० टन, पेरू ८०० प्लास्टिक जाळी (क्रेटस) अशी आवक झाली.
बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर







