GRAMIN SEARCH BANNER

संदीप कानसे लिखित ‘दख्खनचा वाघ’ ऐतिहासिक वगनाट्याचा २३ डिसेंबरला शुभारंभ; रसिक प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Gramin Varta
79 Views

मुंबई :कोकणातील सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक संदीप कानसे यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘दख्खनचा वाघ’ या नवीन ऐतिहासिक वगनाट्याचा भव्य शुभारंभ प्रयोग मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत होत आहे. गेली २६ वर्षे नमन लोककलेच्या माध्यमातून इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या कानसे यांच्या या नव्या कलाकृतीबद्दल नाट्यप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विलेपार्ले येथील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रात्री ८:३० वाजता हा प्रयोग रंगणार आहे.

स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा आणि स्वराज्याचा धगधगता इतिहास या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. साई श्रद्धा कानसे ग्रुपचा या हंगामातील हा १९१ वा नमन प्रयोग असून, याद्वारे अनेक नवीन महिला, पुरुष आणि बालकलाकार रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. या प्रयोगात रसिकांना कोकणचे पारंपारिक खेळे, गण आणि नटखट गवळण अनुभवता येणार आहे. इतिहासाच्या पानांना स्पर्श करणाऱ्या या वगनाट्याला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3369555
Share This Article