GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेत बेकायदेशीर प्रवेश; नाचणे येथील तरुणावर गुन्हा

Gramin Varta
292 Views

रत्नागिरी : शहरालगतच्या नाचणे परिसरात बँकेकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दानिश जमीर पटेल (३९, रा. मजगाव रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी अख्तर फकीर महंमद काझी (५९, रा. पावस) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, दानिश पटेल याचे नाचणे येथील घर बँकेकडून जप्त करण्यात आले होते. २४ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास दानिश पटेल हा जप्त केलेल्या घराजवळ आला. त्यावेळी त्याने घराचे कुलूप तोडून आत बेकायदेशीरपणे प्रवेश केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीच्या आधारे शहर पोलिसांनी दानिश पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3392423
Share This Article