GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात वाशिष्ठी नदीकिनारी गांजा ओढणाऱ्या तरुणावर गुन्हा

Gramin Varta
227 Views

चिपळूण : तालुक्यातील कळंबस्ते येथे वाशिष्ठी नदीच्या किनारी गांजाचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई २६ डिसेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी खेर्डी येथील ३५ वर्षीय तरुणावर चिपळूण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरीश तारानाथ पवार (वय ३५, रा. दातेवाडी, मराठी शाळेसमोर, खेर्डी, ता. चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रोशन शंकर पवार यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास कळंबस्ते येथील क्रेशरच्या जवळ, वाशिष्ठी नदीच्या किनारी हरीश पवार हा बसलेला होता. यावेळी तो सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या गांजासारख्या अंमली पदार्थाचे सेवन करत असताना पोलिसांना मिळून आला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) चे कलम ८ (क) आणि २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3388322
Share This Article