GRAMIN SEARCH BANNER

पूर्णगड येथे ट्रक – कारचा अपघात; कर्नाटकच्या ट्रक चालकावर गुन्हा

Gramin Varta
157 Views

रत्नागिरी : राजापूर-रत्नागिरी मार्गावर पूर्णगड येथील प्राथमिक शाळेसमोरील चढावावर एका ट्रकने समोरून येणाऱ्या इरटीगा कारला धडक दिल्याची घटना घडली आहे. ३० डिसेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, ट्रक चालकाविरोधात पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अशोक राजेंद्र बनप (वय ३५, रा. मुरुगवाडा, नवानगरवाडी, रत्नागिरी) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादी बनप हे आपल्या ताब्यातील इरटीगा कार (क्रमांक एम.एच. ०८ बीई ९४४४) घेऊन राजापूरकडून रत्नागिरीकडे येत होते. ते पूर्णगड प्राथमिक शाळेच्या समोरील चढावावरून जात असताना, समोरून पावस-मेर्वी बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या सहा चाकी ट्रकने (क्रमांक के.ए. २२ डी ८९८५) कारच्या पुढील उजव्या बाजूला धडक दिली. या धडकेमुळे कारचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी कर्नाटकातील ट्रक चालक बालाप्पा रमेश कुश्ती (वय २५, रा. हुकेरी, जि. बेळगाव) याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आणि नुकसान केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3368657
Share This Article