GRAMIN SEARCH BANNER

वाशिष्ठ डेअरीतर्फे भव्य कृषी महोत्सव;
नगराध्यक्षांकडून तयारीची पाहणी

Gramin Varta
148 Views

कोकणी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कलाकृतींचे कौतुक

चिपळूण : वाशिष्ठ डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांच्या वतीने चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर दिनांक ५ जानेवारीपासून भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या तयारीची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, नगरसेवक निहार कोवळे, प्रशांत वाजे, अविनाश गुढेकर, गणेश कदम, संदीप पाटील, महेंद्र खेतले, सुदेश राठोड शिवसेना विभाग प्रमुख राधाकृष्ण नगर आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षांनी महोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या भव्य मंडपाची तसेच कोकणी पद्धतीचे घर आणि कोकणी पद्धतीचे गोठे या कलाकृतींचे विशेष कौतुक केले. याशिवाय ‘मुक्त गोठा’ या संकल्पनेचेही त्यांनी स्वागत केले.

याबाबत माहिती देताना स्वप्ना यादव यांनी सांगितले की, या सर्व कलाकृती स्थानिक कलाकारांनी उभ्या केल्या असून या ठिकाणी जणू संपूर्ण कोकण साकारण्यात आला आहे.या कृषी महोत्सवात विविध जातींच्या गायी, म्हशी व इतर पशुधन, तसेच घोड्यांचे दर्शन, कॅट शो, डॉग शो आणि नागरिकांच्या मनोरंजनासाठी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कृषी महोत्सवाचा सर्व नागरिकांनी कुटुंबासह लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी यावेळी केले.

Total Visitor Counter

3366849
Share This Article