GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात विजेचा धक्का बसून तरुण वायरमनचा मृत्यू

Gramin Varta
499 Views

राजापूर : तालुक्यातील पेंडखळे येथील भवानी मंदिर परिसरात विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का बसून तरुण वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उशिरा घडली. अनिकेत परवडी (वय २७, रा. तिथवली, ता. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वीजपुरवठा ऑपरेटरकडून बंद करून अनिकेत परवडी हा दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढला होता. मात्र काम सुरू असतानाच त्याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे तो तोल जाऊन खाली पडला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेनंतर अनिकेत परवडी याचे पार्थिव सायंकाळी उशिरा राजापूर येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Total Visitor Counter

3388207
Share This Article