GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : भालावली जाकादेवी मंदिरातील दानपेटी चोरी, १० हजारांची रोकड लंपास

Gramin Varta
301 Views

राजापूर : तालुक्यातील भालावली येथील जाकादेवी मंदिरासमोर ठेवलेली दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या दानपेटीत सुमारे १० हजार रुपयांची रोकड असल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते ३० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० या कालावधीत घडली. मंगळवारी सकाळी सुहास सुदाम भोसले (रा. भालावली, वराभंडारवाडा) हे जाकादेवी मंदिरात दर्शनासाठी आले असता मंदिरासमोर ठेवलेली दानपेटी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तात्काळ राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार दानपेटीत सुमारे १० हजार रुपयांची रोकड होती, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी चोरीची घटना घडल्याने भालावली परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच चोरट्यांचा शोध सुरू आहे.

Total Visitor Counter

3368330
Share This Article