GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण नगर परिषदेच्या काँग्रेस गटनेतेपदी साजिद सरगुरोह यांची निवड

Gramin Varta
25 Views

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगर परिषदेत काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी युवक काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांची निवड करण्यात आली आहे. नगर परिषदेत काँग्रेसचे एकूण तीन नगरसेवक असून, पक्षाच्या वतीने गटनेतेपदाची जबाबदारी साजिद सरगुरोह यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

साजिद सरगुरोह हे एक अभ्यासू, सक्रिय आणि शहरातील विविध समस्या, प्रश्नांची सखोल जाण असलेले युवा कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी संघटन वाढीसाठी तसेच सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी साजिद सरगुरोह यांच्यावर विश्वास दाखवत गटनेतेपदासाठी त्यांची निवड केली. त्यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेत काँग्रेस पक्ष अधिक प्रभावीपणे शहरातील नागरिकांचे प्रश्न मांडेल, तसेच सत्ताधारी पक्षाच्या धोरणांवर योग्य ते नियंत्रण ठेवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, नागरी सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर काँग्रेस गट आक्रमक भूमिका घेणार असून, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी नगर परिषदेत ठोस भूमिका मांडली जाईल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.साजिद सरगुरोह यांच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Total Visitor Counter

3366959
Share This Article