GRAMIN SEARCH BANNER

दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या खेट्यांना प्रारंभ

Gramin Varta
97 Views

हजारो भाविकांचा ‘जोतिबाच्या नावानं चांगभल’चा जयघोष !

कोल्हापूर: माघ पौर्णिमेनंतर येणार्‍या पहिल्या रविवारी म्हणजे ८ फेब्रुवारीला श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या खेट्यांना प्रारंभ झाला.

कोल्हापूरसह महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांतून हजारो भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने पहाटेपासूनच पायी चालत येऊन डोंगरावर येऊन जोतिबा देवाचे दर्शन घेतले. हे खेटे माघ मासातील ५ रविवारी पार पडतात. या वेळी ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ च्या जयघोषानं दुमदुमून गेला.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दर्शन रांगांसाठी बॅरिकेड्स, मुखदर्शनासाठी विशेष स्क्रीन, पोलीस सुरक्षा, आरोग्य मित्र आणि स्वयंसेवकांची व्यवस्था केली आहे. प्रचलित आख्यायिकेनुसार पूर्वी केदारनाथ दक्षिणेतील मोहिमेनंतर हिमालयाकडे परतत असताना करवीरच्या निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी अनवाणी धावत आली आणि त्यांना थांबण्याची विनंती केली. श्री महालक्ष्मीच्या आर्त विनवणीमुळे जोतिबा डोंगरावर विराजमान झाले. प्रथेप्रमाणे भाविक पहाटे ४ वाजता प्रारंभ होणार्‍या खेट्यात सहभागी होतात. ते पंचगंगा नदीघाटावर स्नान करून चालत येतात. दिवसभर गुलाल-खोबर्‍याची उधळण चालू असते. कोल्हापूर आणि आसपासचे भाविक या खेट्यांच्या दिवशी जोतिबा डोंगरावर देवाचं दर्शन घेण्यासाठी न चुकता चालत येतात.

Total Visitor Counter

3225430
Share This Article