GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील ‘आयुष’ विभाग ठरतोय कुचकामी; सहा महिन्यांपासून युनानी औषधांचा तुटवडा, रुग्णांचे प्रचंड हाल

Gramin Varta
119 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘आयुष’ विभागाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या विभागातील युनानी औषधांचा साठा पूर्णपणे संपला असून, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. एकीकडे सरकार पर्यायी औषधोपचार पद्धतीला प्रोत्साहन देण्याच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र औषधांअभावी रुग्णांची मोठी ससेहोलपट होत आहे.

जिल्हा रुग्णालयातील या विभागात दररोज सरासरी १० ते १५ रुग्ण मोठ्या आशेने उपचारासाठी येतात. युनानी तज्ज्ञ डॉक्टरदेखील दररोज बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) वेळेवर उपस्थित राहतात. मात्र, केवळ औषधे उपलब्ध नसल्याने डॉक्टर फक्त तपासणी करून रुग्णांना सल्ला देण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीत. विशेष म्हणजे, युनानी औषधे ही सहजासहजी खासगी मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे  औषधे नेमकी आणायची कुठून, असा संतप्त सवाल रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक विचारत आहेत. गरिबांसाठी आधार ठरणारा हा सरकारी दवाखाना आता केवळ नावापुरताच उरला आहे की काय, अशी भावना जनमानसात उमटत आहे.

गेल्या १८० दिवसांपासून ही गंभीर परिस्थिती असूनही प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. ग्रामीण भागातून अनेक रुग्ण भाडे खर्च करून शहरात येतात, पण औषधे मिळत नसल्याने त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या विदारक परिस्थितीबाबत जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांना विचारणा केली,  डॉ. जगताप म्हणाले की, युनानी औषधांचा पुरवठा हा थेट राज्य स्तरावरून केला जातो. सध्या असलेला औषधांचा साठा संपला असून, अद्याप वरून नवीन पुरवठा झालेला नाही. मात्र, राज्य स्तरावरून औषधे प्राप्त होताच ती तातडीने रुग्णांना उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

प्रशासनाचे हे उत्तर तांत्रिकदृष्ट्या बरोबर असले, तरी सहा महिने औषधे नसणे हे आरोग्य विभागाचे मोठे अपयश मानले जात आहे. वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात जिल्हा रुग्णालय प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत. आता यावर वरिष्ठ अधिकारी कधी लक्ष देतात आणि सामान्य रत्नागिरीकरांना या त्रासातून कधी मुक्ती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आ

Total Visitor Counter

3369375
Share This Article