GRAMIN SEARCH BANNER

खेडशी गयाळवाडी येथे वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी: रत्नागिरी– रत्नागिरी–हातखंबा रस्त्यावरील खेडशी गयाळवाडी येथे वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ट्रकचालकावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश बबन नाईकवाडी (वय ५५, रा. खानापूर, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.सतीश नाईकवाडी याने २७ फेब्रुवारी रोजी आपल्या ताब्यातील ट्रक खेडशी गयाळवाडी येथे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीत उभा केल्याची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकारामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Total Visitor Counter

3483803
Share This Article