GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्हा परिषदेला २०२६-२७ साठी ३३.६१ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Gramin Varta
3 Views

४५.९० कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकालाही सर्वानुमते मंजुरी; पाणीपुरवठा, समाजकल्याण व बांधकाम विभागांना मोठी तरतूद

रत्नागिरी : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर जिल्हा परिषदेकडून आर्थिक नियोजनाला गती मिळाली असून, अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी सादर केलेल्या सन २०२५-२६ च्या ४५ कोटी ९० लाख ९४ हजार ९९१ रुपयांच्या अंतिम सुधारित अंदाजपत्रकाला तसेच सन २०२६-२७ साठी ३३ कोटी ६१ लाख ७३ हजार ५०० रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, शिक्षण व अर्थ समिती सभापती नंदकुमार मुरकर, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती महेश नाटेकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बालकल्याण सभापती मयुरी शिर्के, माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांच्यासह सदस्य, खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

अंदाजपत्रकात ग्रामीण पाणीपुरवठा (३.६५ कोटी), समाजकल्याण विभाग (६.४४ कोटी) आणि बांधकाम विभाग (५.१२ कोटी) यांना मोठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य आणि कृषी विभागांनाही लक्षणीय निधी देण्यात आला आहे.

दरम्यान, सामूहिक विकास विभागाच्या तरतुदीत घट करण्यात आली असून निवृत्तीवेतनासाठीच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. विविध विभागांतील या निधी वाटपामुळे जिल्ह्यातील मूलभूत सुविधा, सामाजिक योजना आणि पायाभूत विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


विभागनिहाय तरतूद (रुपयांत)
विभाग अंतिम सुधारित तरतूद (२०२५-२६) मूळ तरतूद (२०२६-२७)
अध्यक्ष – सामान्य प्रशासन ८,७८,००० ६०,००,०००
सामान्य प्रशासन २,३८,७२,७०४ २,१९,५५,२००
ग्रामीण पाणी पुरवठा ३,६५,१६,१२३ २,२३,८५,२२०
समाजकल्याण विभाग ६,४४,१०,१२९ २,११,००,२२०
दिव्यांग कल्याणकारी योजना ७७,१७,००० ८६,६१,८६०
महिला व बालकल्याण १,८१,०७,८१० १,०५,५०,११०
शिक्षण विभाग १,२९,८२,४८८ ९५,४३,५००
बांधकाम विभाग ५,१२,४६,७१० ३,८७,८२,०००
पाटबंधारे २,००,००० १,५०,२००
आरोग्य विभाग १,२७,००,००० ७०,००,०००
कृषी विभाग १,१७,४९,९०० ८०,००,०००
पशुसंवर्धन ६५,००,००० ७०,००,०००
जंगले ५,५९,९३२ १,५०,०००
सामूहिक विकास ५०,००,००० १,००,००,०००
संकीर्ण उर्जा विकास ५,००,००० ५,००,०००
निवृत्तीवेतन ७०,००,००० १७,००,०००
संकीर्ण ८,८६,०९,१०५ ४,५६,००,६८९

Total Visitor Counter

3218823
Share This Article