GRAMIN SEARCH BANNER

गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी साहिल आरेकर यांची निवड

गुहागर  : गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अध्यक्षपदी साहिल प्रदीप आरेकर यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, रत्नागिरी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर, महिला आघाडी जिल्हा सचिव सौ. मनाली आरेकर, तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ. शलाका काष्ट, तालुका खजिनदार दीपक शिरधनकर, महिला आघाडी तालुका सेक्रेटरी सौ. ऋशा ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. साहिल आरेकर यांनी या नियुक्तीनंतर बोलताना सांगितले की, पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला मी न्याय देईन. गुहागर तालुक्यात पक्ष संघटन बळकट करून, युवांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Total Visitor Counter

2475119
Share This Article