GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण तालुक्यातील कान्हे कदमवाडीत विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

Gramin Varta
219 Views
suicide concept. noose with shadow on dark wall background

चिपळूण :तालुक्यातील कान्हे कदमवाडी येथे एका ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्वेता राजेश कदम (वय ३५, रा. कान्हे कदमवाडी, ता. चिपळूण) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.४५ वाजण्यापूर्वी घडली. श्वेता कदम यांनी आपल्या राहत्या घरातील मजघरात असलेल्या आयबीमला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. त्या मयत अवस्थेत मिळून आल्यानंतर या घटनेची माहिती शिरगाव पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

याप्रकरणी अलोरे पोलीस दूरक्षेत्रांतर्गत शिरगाव पोलीस ठाण्यात २९ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ आणि आमृ. क्रमांक ०७/२०२६ नुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3391843
Share This Article