GRAMIN SEARCH BANNER

राजापूर पालिका १५०व्या वर्धापन दिन ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत सान्वी जड्यार विजयी

राजापूर: राजापूर नगरपालिकेच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालकल्याण विभागाने आयोजित केलेल्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत हर्डी येथील सान्वी संकेत जड्यार यांनी प्रथम क्रमांक पटकावत मेगा पैठणीचा मान मिळविला.

शहरातील जवाहर मैदान येथे रंगलेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक सारिका ढोले, तृतीय क्रमांक सोनाली नाईक यांनी मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिके संगीता उदय खडपे व माया शंकर भेडसे यांनी पटकावली. कार्यक्रमाचे निवेदन योगेश शिंदे यांनी विनोदी शैलीत केल्याने वातावरणात हास्याची बरसात झाली.

कार्यक्रमाचा प्रारंभ नगराध्यक्ष सौ. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते झाला. यावेळी तहसीलदार विकास गंबरे, मुख्याधिकारी अभिजित कुंभार, विरोधी गटनेते ॲड. राहुल तांबे, गटनेते ॲड. जमीर खलिफे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती शबाना मुल्ला यांच्यासह नगरसेवक, माजी नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्यासह राजेंद्र नवाळे, प्रशांत पवार, दीनानाथ कोळवणकर, विवेक गादीकर तसेच माजी नगरसेवक जयप्रकाश नार्वेकर यांनी पालिकेच्या कार्याचा गौरव केला.

दरम्यान, शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त नगराध्यक्ष सौ. खलिफे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून घोषणा देऊन वातावरण उत्साहपूर्ण केले.

Total Visitor Counter

3485147
Share This Article