GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी – डिजिटल टेक्नॉलॉजी कार्यशाळेला प्रारंभ

रत्नागिरी: येथील उज्वल शिक्षण मंडळ संचालित आगम द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट येथे पुण्यातील डिजिटल टेक्नॉलॉजी तज्ज्ञ संजय साळुंखे यांच्या तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहात झाले.ही कार्यशाळा १९ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे, उदय शिंदे यांच्या हस्ते संजय साळुंखे यांचे स्वागत करण्यात आले. संजय साळुंखे एमएस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) असून डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझाइनिंग, नेटवर्किंग, प्री-प्रेस टेक्निक्स, वेब डिझाइनिंग व मल्टिमीडिया अॅनिमेशन या विषयांतील तज्ज्ञ आहेत. तसेच ते सर्टिफाइड वेब मास्टर असून अमेरिकेतील नोव्हेल कॉर्पोरेशनकडून वेब अॅडमिनिस्ट्रेशन, नेटवर्क टेक्नॉलॉजी, डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन, इन्स्टॉलेशन व सर्व्हिस सपोर्ट या विषयांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे.

या कार्यशाळेस शासकीय आयटीआयमधील डीटीपी विभागाचे विद्यार्थी तसेच इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक प्रा. संदेश पालये यांनी केले. यावेळी प्रतीक्षा पांचाळ, अनिश दाते यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3485291
Share This Article