GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषद सभासद याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू

रत्नागिरी: कोकण मराठी साहित्य परिषदेची रत्नागिरी शाखा पेपरलेस करण्याचे प्रयत्न करीत असून सभासद याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे.रत्नागिरी शाखेतील बहुसंख्य सभासदांचे पत्ते व मोबाइल नंबर पूर्णपणे दिलेले नसल्याने या कामात अडचण येत आहे.

रत्नागिरी शाखेतील सर्व सभासदांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, सभासदांनी आपला पिनकोडसह पत्ता व मोबाइल नंबर, व्हॉट्सअॅप क्रमांक खालील नंबरवर पाठवावा.ही माहिती रविवार, दिनांक 19 एप्रिल 2026पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या सर्व कार्यक्रमांची माहिती सभासदांना देणे शक्य होईल. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर व केंद्रस्तरावर विविध संमेलन स्पर्धांची माहितीदेखील देणे सोपे होईल.सभासदांनी चंद्रमोहन देसाई (9764796676), विद्याधर कांबळे (8459455472), राजेंद्र चव्हाण (9764634587) किंवा विनायक हातखंबकर (9970323545) यांच्याकडे आपली माहिती कळवावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3485291
Share This Article