GRAMIN SEARCH BANNER

आंबेनळी घाटात दुचाकी ७०० फूट दरीत कोसळली; दांपत्याचा जागीच मृत्यू

महिलेचा मृतदेह आज बाहेर काढणार

अलिबाग : महाबळेश्वर कडून पोलादपूरच्या दिशेने येणारी दुचाकी दरीत कोसळल्याने दांपत्याचा मृत्यू झाला. स्थानिक बचाव पथकाने त्यांचे मृतदेह अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले.मिळालेल्या माहितीनुसार, आंबेनळी घाटातील एका अतिधोकादायक वळणावर स्प्लेंडर बाईक बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली.

या घटनेवरून बाईकवरील प्रवासी दरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यानंतर तात्काळ प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली.

रेस्क्यू टीमने दोरांच्या साहाय्याने सुमारे 500 फूट खोल दरीत उतरून अत्यंत धोकादायक परिस्थितीन शोधकार्य सुरू केले. अंधार, निसरडे उतार, दाट आणि सुरू असलेला पाऊस यामुळे ही मोहीम अत्यंत कठीण बनली होती. रात्री सुमारे 1 वा 30 मी वाजेपर्यंत सुरू असलेल्या अथक प्रयत्नांनंतर प्रथम पुरुषाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, प्रतिकूल हवामान आणि वाढत्या धोक्यामुळेउर्वरित बचावकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानंतर 24 एप्रिल रोजी सकाळी पुन्हा बचावमोहीम सुरू करण्यात आली. तीन तासांच्या अथक मेहनतीनंतर महिलेचा मृतदेहही दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेत मृतांची ओळख मोहन चव्हाण (55) आणि जयश्री चव्हाण (48) रा. सोनगिरवाडी अशी झाली आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

Total Visitor Counter

3485940
Share This Article