GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण तालुका डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी निसार शेख तर कार्याध्यक्षपदी स्वप्निल घाग यांची बिनविरोध निवड

Gramin Varta
14 Views

चिपळूण: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या चिपळूण तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली.

चिपळूण: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या चिपळूण तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये चिपळूण तालुका अध्यक्षपदी निसार शेख आणि कार्याध्यक्षपदी स्वप्निल घाग यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तसेच उपाध्यक्ष सचिन कांबळे ,सचिव शकील तांबे,सहसचिव हेमंत चव्हाण,खजिनदार कृष्णकांत साळगावकर, सहखजिनदार स्वाती हडकर याची निवड करण्यात आली.

पत्रकारितेच्या क्षेत्रात डिजिटल माध्यमांचे वाढते महत्त्व विचारात घेऊन संघटनेची ताकद वाढवण्यासाठी ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष मिलिंद आष्टीकर आणि डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीच्या वेळी उपाध्यक्ष हेमंत वणजु, मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर आणि डिजिटल मीडिया परिषद रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

नूतन कार्यकारिणीमध्ये निसार शेख (अध्यक्ष) आणि स्वप्निल घाग (कार्याध्यक्ष) यांच्यासह सचिन कांबळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रशासकीय जबाबदारीसाठी सचिव म्हणून शकील तांबे आणि सहसचिव म्हणून हेमंत चव्हाण काम पाहतील. आर्थिक विभागाची जबाबदारी खजिनदार कृष्णकांत साळगावकर आणि सह खजिनदार स्वाती हडकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्य म्हणून बाळू कोकाटे, राजेश जाधव, सुरेश पवार, शाहीद खेरटकर आणि जमालुद्दीन बंदरकर यांचा समावेश करण्यात आला आहे. या निवडीच्या प्रसंगी मराठी पत्रकार परिषद चिपळूण शाखेचे समीर जाधव आणि नागेश पाटील उपस्थित होते.डिजिटल माध्यमांमधील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि संघटनेचे कार्य अधिक विस्तारण्यासाठी ही नवनियुक्त टीम प्रयत्नशील राहील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. निवडीनंतर चिपळूणमधील पत्रकारितेच्या वर्तुळातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3324100
Share This Article