GRAMIN SEARCH BANNER

डी.बी.जे. महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

Gramin Varta
11 Views

चिपळूण: बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी डी.बी.जे. महाविद्यालयाच्या वतीने करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सोमवार, दि. ४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडणार आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या निवडीबाबत संभ्रम निर्माण होतो. विद्यार्थ्यांचा हा संभ्रम दूर करून त्यांना त्यांच्या आवडी व क्षमतेनुसार योग्य करिअर पर्याय निवडता यावा, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.

या कार्यशाळेत आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या पारंपारिक शाखांबरोबरच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संधींबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विद्यापीठाच्या ‘समर्थ’ पोर्टलवर नावनोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीही देण्यात येणार आहे.

दरम्यान, महाविद्यालयातील विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज विक्रीस प्रारंभ झाला असून, सर्व विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.

Total Visitor Counter

3350456
Share This Article