GRAMIN SEARCH BANNER

आपलं चिपळूण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. यतीन जाधव

Gramin Varta
4 Views

चिपळूण: आपलं चिपळूण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. यतीन जाधव यांची निवड झाली आहे.सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आपलं कोकण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेंड येथील स्प्रिंग क्लिनिकमधील संस्थेच्या कार्यालयात पार पडली.यावेळी पुढील पाच वर्षांसाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

२०१२ पासून कार्यरत असलेल्या या संस्थेने प्रसिद्धीपासून दूर राहून निःस्वार्थ भावनेने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य शिबिरे, निराधारांना मदत, निसर्ग संवर्धन, प्राणी-पक्षी संरक्षण, शहर सुशोभीकरण तसेच दुर्गम भागातील विद्यार्थी आणि निराधार वृद्धांना साह्य अशा अनेक क्षेत्रांत संस्थेचे योगदान राहिले आहे.

सभेत आगामी वर्षासाठी विविध उपक्रमांचा सविस्तर आराखडा निश्चित करण्यात आला. चिपळूण शहराच्या विकासासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि नदी-नाले संवर्धन कार्यकर्त्यांसोबत चर्चासत्र आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोकणातील परंपरा आणि संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, पुस्तक रोटेशन योजना, गुणवंत विद्यार्थ्यांमार्फत मार्गदर्शन शिबिरे, गड-किल्ले भ्रमंती, पशु-पक्षी निरीक्षण, वृक्षलागवड, कार्बन क्रेडिट योजनेबाबत जनजागृती तसेच आरोग्य, ध्यान, मनःशांती आणि निसर्गोपचार विषयक उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या शेवटी गेल्या १४ वर्षांपासून कार्यभार सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. मावळते अध्यक्ष उदय ओतारी यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्षपदी संतोष देशमुख, उपाध्यक्षपदी प्रशांत पाटेकर व मनोज जाधव, सचिवपदी उदय ओतारी, सहसचिवपदी प्रशांत देवळेकर, खजिनदारपदी फैय्याज देसाई, सहखजिनदारपदी राजू दरेकर यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून जितेंद्र सुर्वे, निहार जोशी, मंगेश गोंधळेकर, प्रसन्न आवले आणि विशाल जानवलकर यांचा समावेश करण्यात आला.

ही संस्था महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असून लवकरच महिला व पुरुष सर्वसाधारण सभासदांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती विद्यमान सचिव उदय ओतारी यांनी दिली.

Total Visitor Counter

3377925
Share This Article