GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटतर्फे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंगेश किनरे यांचा सन्मान

Gramin Varta
4 Views

रत्नागिरी: सीए इन्स्टिट्यूटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंगेश किनरे यांचा रत्नागिरी शाखेतर्फे सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे झाला.राष्ट्रीय उपाध्यक्षांनी रत्नागिरी शाखेला प्रथमच भेट दिली.

रत्नागिरी शाखेतर्फे मंगेश किनरे यांचा सत्कार केदार करंबेळकर आणि उपाध्यक्ष सीए अक्षय जोशी यांनी शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन केला. सत्काराला उत्तर देताना सीए मंगेश किनरे यांनी सांगितले की, सीए इन्स्टिट्यूटची रत्नागिरी शाखा सुरू करण्याकरिता मदत केली आहे. रत्नागिरी शाखेशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माझे गाव राजापूर तालुक्यातील पेंडखळे असून आज माझा झालेला सन्मान घरच्यांनी केल्यामुळे खूप आनंद झाला.

सीए इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील काही किस्से आणि अनुभव त्यांनी सांगितले. तांत्रिक गोष्टींची माहिती, सर्वांचे चांगले संबंध, कामाचा आवाका, वक्तशीरपणा आणि पारदर्शकपणा अशा अनेक गोष्टी आयुष्यात प्रगती करण्यासाठी महत्त्वाच्या असतात असा अनुभव आल्याचे किनरे यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकामध्ये सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए केदार करंबेळकर यांनी सांगितले की, आज आपल्या इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांची रत्नागिरी भेट आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. किनरे सरांशी सहज संपर्क साधता येतो आणि कोणतीही अडचण आली तरी त्यातून मार्ग काढण्याचे मार्गदर्शन आणि व्यक्तिगत संवाद यामुळे रत्नागिरीत बहुतांशी सीएंशी त्यांचा स्नेहबंध जुळला आहे.

यावेळी रत्नागिरी शाखेचे माजी अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये, खजिनदार सीए शरदचंद्र वझे यांनी सीए मंगेश किनरे यांच्याविषयी मनोगतामध्ये गुणवैशिष्ट्ये सांगितली. विभागीय कौन्सिल मेंबर सीए मंगेश घाणेकर आणि सीए संजय निकम हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Total Visitor Counter

3395951
Share This Article