GRAMIN SEARCH BANNER

निवळी-जयगड मार्गावर गॅस टँकरचा अपघात; मोठी दुर्घटना टळली

Gramin Varta
95 Views

रत्नागिरी : निवळीहून जयगडकडे जाणाऱ्या गॅस टँकरला सोमवारी रात्री अपघात झाला. अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन बाहेर कलंडला.

अपघातानंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने चालक या दुर्घटनेतून बचावला. तसेच टँकर सुरक्षित अवस्थेत असल्याने कोणतीही गॅस गळती झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता.

Total Visitor Counter

3396072
Share This Article