GRAMIN SEARCH BANNER

शिष्यवृत्ती परीक्षेत प्रणय कांबळे तालुक्यात प्रथम; लायन्स क्लब ऑफ खेड सिटीकडून गौरव

Gramin Varta
13 Views

खेड (प्रतिनिधी) : लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून खेड पंचायत समिती आणि गटशिक्षणाधिकारी बाईत साहेब यांच्या सहकार्याने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी २१ दिवसांचा शिष्यवृत्ती प्रशिक्षण कॅम्प राबविण्यात आला होता. या कॅम्पमधील विद्यार्थ्यांचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, साखरोली मोरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कुमार प्रणय प्रशांत कांबळे याने ३०० पैकी २७४ गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उज्वल यश संपादन केले आहे.

प्रणयच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी साखरोली बौद्धवाडी येथील त्याच्या निवासस्थानी जाऊन त्याचा यथोचित सत्कार केला. यावेळी त्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने मार्गदर्शन करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक करण्यात आले.

या सत्कार समारंभाला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, उपाध्यक्ष अविनाश दळवी, आदर्श शिक्षक अनिल मोरे सर, कांबळे कुटुंबीय तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रणयच्या यशामुळे साखरोली परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

3417998
Share This Article