GRAMIN SEARCH BANNER

प्रसिद्ध उर्दू शायर आणि गझलकार डॉ. बशीर बद्र यांचे निधन

Gramin Varta
28 Views

भोपाळमध्ये 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भोपाळ: प्रसिद्ध उर्दू शायर आणि गझलकार डॉ. बशीर बद्र यांचे गुरुवारी दुपारी भोपाल येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 91 वर्षांचे होते.

गेल्या काही काळापासून ते डिमेंशिया या आजाराने त्रस्त होते आणि त्यांची तब्येत सातत्याने खालावत होती. त्यांनी आपल्या घरीच अखेरचा श्वास घेतला.

डॉ. बशीर बद्र यांच्या निधनाने उर्दू साहित्य आणि शायरीच्या जगात शोककळा पसरली आहे. त्यांच्या गझला आणि शेरांनी सामान्य वाचकांपासून ते साहित्यप्रेमींपर्यंत सर्वांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले होते. प्रेम, विरह, एकटेपणा आणि आशा या मानवी भावनांना त्यांनी अतिशय सोप्या आणि प्रभावी शब्दांत मांडले.गेल्या काही वर्षांपासून त्यांना डिमेंशिया झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी झाली होती आणि ते अनेकदा लोकांना ओळखूही शकत नव्हते. तरीही त्यांची साहित्यिक ओळख आणि लोकप्रियता कायम राहिली.

त्यांच्या काही प्रसिद्ध ओळी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत-

“उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो,

न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए…”

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे 15 फेब्रुवारी 1935 रोजी जन्मलेले बशीर बद्र नंतर भोपाळ येथे स्थायिक झाले. त्यांनी उर्दू साहित्याला अनेक अजरामर गझला आणि शेर त्यांनी दिले. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात असून, साहित्यप्रेमी त्यांना भावपूर्ण निरोप देत आहेत.

Total Visitor Counter

3485127
Share This Article