GRAMIN SEARCH BANNER

खेडचे नूतन गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले यांचा शिक्षक समितीकडून सत्कार

Gramin Varta
132 Views

खेड: खेड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी संतोष भोसले यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. खेडचे नूतन गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भोसले यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आणि त्यांच्या भावी प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभाच्या निमित्ताने शिक्षक समितीने तालुकातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे नूतन गटशिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यामध्ये प्रामुख्याने पदवीधर शिक्षकांची बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली वेतन त्रुटी निश्चिती त्वरित पूर्ण करावी आणि ती मंजुरीसाठी जिल्हा कार्यालयाकडे पाठवावी, या मागणीचे लेखी निवेदन भोसले यांना सुपूर्द करण्यात आले.

या सत्कार प्रसंगी आणि निवेदन देताना शिक्षक समितीचे खेड तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सरचिटणीस धर्मपाल तांबे, जिल्हा उपाध्यक्ष शरद भोसले, जिल्हा प्रतिनिधी राजेश भागणे, कार्याध्यक्ष अनिल यादव, उपाध्यक्ष श्रीकृष्ण खांडेकर, नरेश ठोंबरे, प्रवक्ते शैलेश पराडकर, दिलीप यादव, अजित भोसले, परशुराम पेवेकर, बबन मोरे, गजानन पालांडे, अनंत मोरे आणि मंगेश वायकर आदी शिक्षक समितीचे प्रमुख पदाधिकारी व शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी या सत्कार बद्दल शिक्षक समितीचे आभार मानले, तसेच शिक्षकांच्या कायदेशीर मागण्या व वेतन त्रुटी संदर्भातील प्रस्तावावर सकारात्मक आणि वेगाने कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

Total Visitor Counter

3485068
Share This Article