GRAMIN SEARCH BANNER

जागतिक सायकल दिनानिमित्त रविवारी रत्नागिरीत विशेष सायकल फेरी

Gramin Varta
88 Views

रत्नागिरी: जागतिक सायकल दिनानिमित्त येत्या ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल’ विशेष सायकल फेरी रत्नागिरीत आयोजित करण्यात आली आहे. सायकल फेरीचा मार्ग मारुती मंदिर सर्कल- हॉटेल सिल्वर स्वान- सायकल ट्रॅक रोड- नूतन नगर- अभ्युदय नगर- पॉवर हाऊस-मारुती मंदिर सर्कल असा असेल.

देशातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी केंद्र शासन खेलो इंडिया योजनेच्या फीट इंडिया या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवित आहे.

अशाच उपक्रमांपैकी जिल्हास्तरावर संडे ऑन सायकल या विशेष सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सायकल वापराचे महत्त्व अधोरेखित करणे, पर्यावरण संवर्धनास चालना देणे आणि नागरिकांमध्ये निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सायकलिंग हा आरोग्यदायी, पर्यावरणपूरक व किफायतशीर वाहतुकीचा पर्याय असून नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते.

जिल्हास्तरावर ‘संडे ऑन सायकल’ या विशेष सायकल जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकलपटू, क्रीडाप्रेमी, अधिकारी / कर्मचारी, खेळाडू, युवक-युवती, विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू/नागरिकांनी https://fitindia.gov.in/world-bicycle-day वर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

इच्छुकांनी नियोजित वेळ व स्थळी उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. जागतिक सायकल दिनाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.

Total Visitor Counter

3483538
Share This Article