GRAMIN SEARCH BANNER

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या मंडणगड शहराध्यक्षपदी मतीन टेमकर यांची नियुक्ती

Gramin Varta
5 Views

खेड : भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या मंडणगड शहराध्यक्षपदी मतीन इस्माईल टेमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खेड नगरपरिषद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगरपरिषदेचे नगरसेवक व गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे मंडणगड तालुकाध्यक्ष अस्फान खलफे, महेश कंचावडे तसेच भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नियुक्तीनंतर उपस्थितांनी मतीन टेमकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मंडणगड शहरात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यासाठी, तसेच अल्पसंख्याक समाजातील नागरिकांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी टेमकर हे महत्त्वपूर्ण कार्य करतील, असा विश्वास या वेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमादरम्यान आगामी काळातील पक्षविस्तार, संघटनात्मक उपक्रम आणि आंदोलने यांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. नव्याने नियुक्त झालेले शहराध्यक्ष मतीन टेमकर यांनी पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तसेच मंडणगड शहरात पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचा निर्धार या वेळी बोलताना व्यक्त केला.

Total Visitor Counter

3483539
Share This Article