GRAMIN SEARCH BANNER

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात मेघराज राजेभोसले यांचा एकतर्फी विजय

Gramin Varta
103 Views

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात मेघराज राजेभोसले यांच्या पॅनेलने सर्वच १४ जागांवर एकतर्फी विजय मिळविला. पुन्हा एकदा सभासदांनी सत्तारुढ आघाडीला पसंती दिली. १४ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात होते.सतीश रणदिवे यांच्या पॅनेलचा आणि अपक्षांचा धुव्वा उडाला.

सोमवारी सकाळी पेटाळा येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे श्री राम गणेश गडकरी सभागृहात मतमोजणी घेण्यात आली. राज्यातील १२ केंद्रांवर ३४०३ पैकी १६९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तब्बल नऊ वर्षांनंतर महामंडळाच्या निवडणुक झाल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. महामंडळात एकूण १७ जागांपैकी ३ जागा बिनविरोध झाल्या. कोल्हापूर की पुणे-मुंबई अशी ही लढत झाली. त्यात पुणे-मुंबईने बाजी मारली.

मेघराजराजे भोसले, सतीश रणदिवे आणि १६ अपक्ष निवडणूक लढविली. कोल्हापूरच्या आनंद काळे, मिलिंद अष्टेकर यांच्या पँनेलने कडवी लढत दिली. मात्र ते पराभूत झाले. अभिनेत्री वर्षा उसगावकर, विजय खोचीकर, व आनंद शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. विजयी आणि पराभव झालेल्या उमेदवारांत १०० ते १५० मतांचा फरक राहिला.

Total Visitor Counter

3484261
Share This Article