दापोली कृषी विद्यापीठाच्या ‘बीएससी हॉर्टिकल्चर’ परीक्षेत मरियम वाडकर विद्यापीठात द्वितीय!

Gramin Varta
81 Views

दापोली: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘बीएससी हॉर्टिकल्चर’ (उद्यानविद्या) पदवी परीक्षेत कोकणातील प्रसिद्ध सामाजिक व शैक्षणिक व्यक्तिमत्त्व मुनाफ वाडकर यांची सुकन्या कु. मरियम मुनाफ वाडकर हिने दैदीप्यमान यश संपादन केले आहे. मरियमने या परीक्षेत तब्बल ८५.२ टक्के गुणांसह (सीजीपीए) विद्यापीठात द्वितीय क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे.

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण कोकण परिसरातून आणि शैक्षणिक वर्तुळातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मरियमने आपल्या यशाचे श्रेय तिचे माता-पिता, कुटुंबिय आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे.

आपला शैक्षणिक प्रवास पुढे चालू ठेवत मरियम याच विषयात पदव्युत्तर (मास्टर्स) शिक्षण घेत असून, आगामी काळात ‘लँडस्केप प्लॅनिंग, पर्यावरण आणि शाश्वत विकास’ (एन्व्हायर्नमेंट अँड सस्टेनेबिलिटी) या क्षेत्रात भरीव कार्य करण्याचा तिचा मानस आहे. तिच्या या यशाबद्दल वाडकर कुटुंबाचे सर्वच स्तरांतून अभिनंदन केले जात असून, तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी हितचिंतकांकडून विशेष शुभेच्छा व प्रार्थना केल्या जात आहेत.

Total Visitors :
4827212
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *