दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी, २३ जून रोजी एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगीता कुमारी तलेश्वर कुमार मेहता (वय १९, रा. तलसरे, टिळेवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता मेहताने २३ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास संगीताने आपल्या रुममधील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. हा प्रकार लक्षात येताच, तिला तातडीने एका खाजगी रुग्णवाहिकेने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर, दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी तिला मृत घोषित केले. दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दापोलीत १९ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
