चिपळूण : वहाळफाटा येथील क्लासिक रेसिडेन्सीमधील एका बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत टीव्ही चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घरफोडी २३ जून रोजी रात्री ११ ते २४ जून रोजी दुपारी १२.३० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी २५ जून रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्लासिक रेसिडेन्सीमधील रहिवासी प्रमोद गंगाराम कदम (वय ५६, रा. वडेरु, चिपळूण; सध्या रा. वडाळा, मुंबई) हे आपल्या फ्लॅटला कुलूप लावून मुंबईला गेले होते. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून चोरट्याने सुमारे ६,००० रुपये किमतीचा एलजी कंपनीचा ५१ इंचाचा जुना स्मार्ट टीव्ही चोरून नेला.
या घटनेची माहिती मिळताच प्रमोद कदम यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध पोलीस घेत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
चिपळूणमधून मुंबईत गेलेल्या कुटुंबाच्या घरातून चोरट्याने टीव्ही लांबवला
