रायगड : जिल्ह्यातून एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडाजवळ कोर्लई भागात समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे.
रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आढळलेल्या या संशयास्पद बोटीतून काही नागरिक उतरल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.
रायगड पोलीस, कोस्ट गार्डसह नेव्हीकडूनही तपास करु करण्यात आला आहे. कोर्लईच्या समुद्रात रात्रीच्या सुमारास ही बोट दिसली. कोर्लई समुद्र किनाऱ्यापासून तीन नॉटिकल मैल अंतरावर ही संशयास्पद बोट दिसली होती. ही माहिती मिळताच रात्रीपासून रायगड पोलीस, नौदल आणि कोस्ट गार्ड यांच्याकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
ही बोट पाकिस्तानची असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या बोटवर पाकिस्तानची निशाणी असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
रेवदंड समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर संशयास्पद बोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच जागोजागी तपासणी आणि नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे.
रायगड: रेवदंडाजवळ कोर्लई समुद्रात दिसली एक संशयित बोट, पाकिस्तानी खूण, संपूर्ण यंत्रणा अलर्टवर

Leave a Comment