सावर्डे : चिपळूण तालुक्यातील नांदगाव गुरववाडी येथे घराशेजारील गडग्याच्या आडोशाला अवैध दारू बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका घडली.
सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीष रघुनाथ कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. अनिल महादेव रसाळ (वय ५५, रा. नांदगाव गुरववाडी, ता. चिपळूण) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून ५८ क्वार्टर जी.एम. देशी दारू जप्त करण्यात आली, ज्याची एकूण किंमत ६१० रुपये आहे. जप्त केलेल्या मालामध्ये १८० मिलीच्या ८ जी.एम. क्वार्टर दारूचा समावेश आहे, ज्याची किंमत प्रति क्वार्टर ७० रुपये आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार गु.र.नं. ७०/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावर्डे येथे घराशेजारील गडग्याच्या आडोशाला दारू विकणाऱ्यावर गुन्हा
